समुद्र रंग

Published By: 
Dainik Gomantak
Dated On: 
13th January 2023
Luciferase

चित्रकार सुबोध केरकर आणि समुद्र या दोघांमध्ये काहीतरी विशेष नाते नक्कीच आहे. त्याच्या अनेक इन्स्टॉलेशन कलाकृती पाहताना ते लक्षात येते. समुद्र हा त्याच्या कलाकृतीसाठी प्रेरणा बनतोच, पण त्याशिवाब तो त्याला संगीतासारखी आणि एखाद्या गुरुसारखी अंतर्बाह्य साथही देतो.

समुद्रकिनाऱ्यावर त्याने निर्माण केलेल्या 'कलाकृतींमध्ये त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या आणि इतिहासाच्या जाणिवेचा प्रभाबी अंश दिसत असतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि इतर विषयांवर भाष्य करण्यासाठी सुबोध कलेचा वापर बिनदिक्कतपणे करतो. त्या अर्थाने तो कार्यकर्ता असलेला कलाकार आहे.

सुबोधच्या आवडीच्या असलेल्या 'समुद्र' या केरकर विषयावरील त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन 'लुसिफेरास' माजोर्डा येथील 'कार्पे दिएम आर्ट अँड लर्निंग सेंटरमध्ये सुरू होत आहे. समुद्रात असलेले शेवाळ प्रकाशमान करणारे विशिष्ट द्रव्य म्हणजे लुसिफेरास!

'लुसिफेरास' प्रदर्शनाला १४ जानेवारी रोजी संध्याकाळी सुरुवात होत आहे. हे प्रदर्शन १२ फेब्रुवारी पर्यंत चालेल.